"तू एकदा परत ये..."
तू एकदा परत ये,
आणि संग पाहिलेल्या स्वप्नाना मुठ्माती देऊन जा..
परत कधी आली नाहीस तरी चालेल,
पण जाण्यापुर्वी माझ्यां ह्रुद्यातील,
तुझ्या पाउंलखुणा मीट्वुण जा॥
आपल्या स्वप्नांची झालेली राख्ररान्र्गोली पहायला,
तू एकदा परत ये,
आणि प्रत्येक क्षणागंणिक
तुझ्या मधेच अडकलेल माझ मन सोड्वुण दे,
भिऊ नकोस मी अस म्हनणार नाही की,
माझ्या हातात हात घालून बस एकदा
कारण आता हे कळून चुकल आहे की सर्व काही संपल आहे
त्यामुळे उगाच कोरड्या भावनांचा काय फायदा
तू जरी बदललिस तरी,
माझी मात्र एकच इच्छा
की जगातील सर्व सूखे
तुझ्या पायाशी लोळावित
ह्याच माझ्या सदिच्छा..
"निरज"