Tuesday, 20 May 2008

"आयुष्य"

"आयुष्य"



बोलण्याच्या ओघात लोक
मोठ - मोठी आश्वासन देतात
आणी स्वताहासोबत आपल्या
वचनानाही बगल देतात


कधीतरी केंव्हातरी कुठेतरी
अस वाचाल होत की,
जग हे फार "प्रक्टिकल" असत

पण तुज्या शब्दामुळे
तेंव्हा अस वाटाय्च की,
खर्च के हे सुंदर जग
एवढ ्विचित्र असत ?

पण तुला बदललेल पाहून ,
न्टंस्म्राटांच्या ही शब्दाम्धल मर्मृ कळत की,
शेवटी एकच ँअंतीम सत्य उरत की,
"कुणीही कुणाच नसतं"

कुणीही कुणाच नसल तरी,
मी मात्र तुझाच आहे,
तू सोडून गेलेल्या व्ळणाव्रती,
वाट बघत उभा आहे


तुला जस वाटेल तस,
मनसोक्त आयुष्य जगत रहा,
पण जतानां, "तू इथे चुकला होतास",
एवढं मात्र सांगुन जा....

"नीरज" ....


Friday, 16 May 2008

स्वप्न

स्वप्नांत तुझ्या जरूर येईन, पण

कधीच स्वप्नं दाखवणार नाही

तुला घेऊन भरारी घेईन, याहून

अधीक पंख फाकवणार नाही


चंद्र, तारे चरणी वाहीन, असं

कधीच वचन देणार नाही

अशक्यातलं "अ" काढलं म्हणून

अशक्य शक्य होणार नाही


अंथ्रुना बाहेर जातील असं

पायांना पसरवणार नाही

शेवटी मध्यमवर्गीय आहे

हे कधीच विसरणार नाही


समाधानाच्या पुढे कधीच

इच्छेची गती ठेवणार नाही

चारबाय आठच्या खोलीत

राजवाड्याचा दरवाजा मावणार नाही


माझ्यापाशी प्रेम व काळजी

ह्या गोष्टींची कोणतीच सीमा नाही

अगणित हृदय शोधून बघ

इतकं प्रमाण कुठेच जमा नाही


हे सारं तुला मान्य असेल, तर

आहे त्या स्थितीत स्विकार कर

फक्तं माझचं स्वप्न पाहीलं असशील

तर, निसंकोच ते साकार कर ......